Ladaki Bahin eKYC: महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) अंतर्गत ₹१५०० चा लाभ घेणाऱ्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. राज्य सरकारने आता या योजनेसाठी वार्षिक ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक केले आहे आणि त्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
मात्र, याच दरम्यान KYC करण्याच्या नावाखाली अनेक बोगस (Fake) वेबसाईट सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
१. फेक वेबसाईटपासून सावध राहा!
तुम्ही जर ‘लाडकी बहीण योजनेची KYC’ करण्यासाठी गुगलवर सर्च करत असाल, तर तुम्ही अत्यंत सावध राहायला हवे. कारण काही फेक वेबसाईट समोर आल्या आहेत, ज्यामुळे तुमचा महत्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो.
- अधिकृत सरकारी वेबसाईट: KYC करण्यासाठी फक्त आणि फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करा:
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
- बोगस वेबसाईटचे उदाहरण: गुगल सर्चमध्ये
https://hubcomuat.in/
यांसारख्या फेक वेबसाईट दिसत आहेत. ही वेबसाईट सरकारची नसून बोगस आहे. अशा वेबसाईटवर चुकूनही आपली माहिती भरू नका.
२. पती/वडिलांचे आधार बंधनकारक आणि अडचणी
या वर्षीच्या KYC साठी सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे, त्यानुसार लाभार्थ्यांसोबत पती किंवा वडिलांचे आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
अट/समस्या | सद्यस्थिती |
पती/वडिलांचे आधार | KYC करताना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक. |
लाभार्थ्यांची समस्या | ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना KYC करताना कुणाचा आधार नंबर टाकायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. |
वेबसाईट समस्या | अनेक लाभार्थ्यांना KYC करताना ओटीपी (OTP) न येणे किंवा वेबसाईटवर ‘एरर’ येणे, अशा अडचणी येत आहेत. |
सरकारने तातडीने या अडचणींवर आणि विशेषतः ज्यांचे पती/वडील हयात नाहीत, त्यांच्यासाठी वेगळा तोडगा काढणे गरजेचे आहे.
३. Ladki Bahin योजनेची e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
केवळ अधिकृत पोर्टलवर खालील टप्पे वापरूनच KYC पूर्ण करा:
- संकेतस्थळ भेट:
https://ladakibahin.maharashtra.gov.in
या मुख्य संकेतस्थळाला भेट द्या. - e-KYC फॉर्म: मुखपृष्ठावरील e-KYC बॅनरवर क्लिक करा.
- लाभार्थीची माहिती: आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, OTP मिळवा आणि Submit करा.
- पती/वडिलांची माहिती: यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि Captcha कोड नमूद करून, संबंधित मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit करा.
- प्रमाणपत्रे (Declarations): आपला जात प्रवर्ग निवडा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नाहीत, तसेच योजनेचा लाभ फक्त तुम्ही घेत आहात, यासंबंधीची घोषणा (Declaration) प्रमाणित (Check Box) करून Submit बटण दाबा.
- यशस्वी संदेश: पडताळणी यशस्वी झाल्यास, तुम्हाला “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
लाडक्या बहिणींनो, आपली माहिती गोपनीय ठेवा आणि केवळ सरकारी संकेतस्थळाचाच वापर करा.
