Solar Panel Yojana: घरावर Solar Panel फक्त ₹२,५०० मध्ये! महाराष्ट्र सरकारची ‘स्मार्ट सोलर योजना’: ९५% अनुदान, संपूर्ण माहिती
Solar Panel Yojana: महाराष्ट्रातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ वीज ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र शासनाने ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर’ म्हणजेच ‘स्मार्ट सोलर योजना’ (Smart Solar Yojana) सुरू केली आहे.
या योजनेमुळे तुम्हाला तुमच्या घरावर सोलर पॅनल (Solar Panel) फक्त ₹२,५०० ते ₹१०,००० एवढ्या कमी किमतीत बसवता येणार आहे. उर्वरित रकमेसाठी सरकारकडून ९५% पर्यंत अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे, हे सोलर पॅनल महावितरण (MahaVitaran) तुमच्या घरावर बसवणार आहे.
योजनेचा मुख्य उद्देश आणि लाभार्थी
६ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
- उद्देश: सौर ऊर्जेद्वारे निर्मित विजेचा घरगुती वापर करणे आणि शिल्लक वीज महावितरणला विकून ग्राहकांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे.
- लक्ष्य: या योजनेअंतर्गत सुमारे ५ लाख घरगुती ग्राहकांना छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत.
तुम्हाला किती पैसे भरावे लागतील? (अनुदान तपशील)
योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या वर्गवारीनुसार किती रक्कम भरावी लागेल आणि सरकार किती अनुदान देईल, याचा तपशील खालीलप्रमाणे आहे (अंदाजित ₹५०,००० खर्चावर):
ग्राहकांचा गट | ग्राहकाचा हिस्सा (तुम्हाला भरावी लागणारी रक्कम) | राज्य शासनाचा हिस्सा (अनुदान) | केंद्र शासनाचा हिस्सा (अनुदान) |
दारिद्र्य रेषेखालील (BPL) | ₹२,५००/- | ₹१७,५००/- | ₹३०,०००/- |
आर्थिक दुर्बळ (ओपन/सर्वसाधारण) | ₹१०,०००/- | ₹१०,०००/- | ₹३०,०००/- |
अनुसूचित जाती (SC) | ₹५,०००/- | ₹१५,०००/- | ₹३०,०००/- |
अनुसूचित जमाती (ST) | ₹५,०००/- | ₹१५,०००/- | ₹३०,०००/- |
थोडक्यात: तुम्हाला तुमच्या वर्गवारीनुसार फक्त ₹२,५०० ते ₹१०,००० एवढीच रक्कम भरावी लागणार आहे.
पात्रता आणि लाभार्थी निवडीचे निकष
तुम्हाला या ‘स्मार्ट सोलर योजने’चा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
मुख्य पात्रता निकष
- वीज वापर मर्यादा: अर्जदाराचा वीज वापर ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत १०० युनिटपेक्षा जास्त नसावा.
- वीज कनेक्शन: ग्राहकाकडे वैध आणि सिंगल फेज वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- थकबाकी: वीज ग्राहक महावितरणचा थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे.
- इतर योजना: कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणालीसाठी इतर कुठल्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थी निवडीचे नियम
- प्राधान्य: दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना योजनेत प्राधान्याने लाभ दिला जाईल.
- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य: दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी (आर्थिक दुर्बळ) ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर राबवण्यात येईल. जो अगोदर अर्ज करेल त्याला योजनेचा लाभ लवकर मिळेल.
- अर्ज: इच्छुक ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक राहील.
योजनेचा कालावधी
सदर योजनेचा कालावधी मार्च २०२७ पर्यंत असणार आहे.
टीप: दारिद्र्य रेषेखालील कोटा डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण न झाल्यास, महावितरणला हा उर्वरित कोटा ० ते १०० युनिट वापर असलेल्या इतर ग्राहकांसाठी वळवण्याचा अधिकार असेल.
