बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस वाटत सुरू; इथे चेक करा Bandhkaam Kamgar Yojana

Bandhkaam Kamgar Yojana: सणासुदीच्या काळात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने (MahaBOCW) कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी ₹५,००० चा बोनस दिला जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर आता कामगारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

WhatsApp Icon व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा

हा बोनस मिळवण्यासाठी तुम्ही पात्र आहात का आणि तुमच्या बँक खात्याचा तपशील योग्य आहे का, हे कसे तपासावे याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

दिवाळी बोनससाठी पात्रता

  • नोंदणीकृत कामगार: हा बोनस केवळ नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच मिळेल. ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांना याचा लाभ मिळणार नाही.
  • नूतनीकरण: ज्या कामगारांनी नोंदणी केली होती, पण वेळेवर त्याचे नूतनीकरण केले नाही, ते देखील या बोनससाठी अपात्र असतील.

जर तुम्ही या दोन्ही अटी पूर्ण करत असाल, तर तुमचा बँक तपशील योग्य आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. चुकीच्या किंवा निष्क्रिय बँक खात्यामुळे तुमचा बोनस अडकू शकतो.

तुमचे बँक तपशील ऑनलाइन कसे तपासावे?

तुमच्याकडे सक्रिय मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि बँक पासबुक असल्यास तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच बँक तपशील तपासू शकता. यासाठी खालील सोप्या पायऱ्या वापरा:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. भाषा निवडा: वेबसाइट उघडल्यावर, सोयीसाठी भाषा इंग्रजी (English) निवडा, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत.
  3. लॉगिन करा: ‘Construction worker profile login’ या पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून ‘Proceed to form’ बटनावर क्लिक करा.
  4. ओटीपी टाका: तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) दिलेल्या बॉक्समध्ये टाकून लॉगिन करा.
  5. बँक तपशील तपासा: लॉगिन झाल्यावर तुम्हाला तुमचा बँक तपशील दिसेल. तो योग्य असल्याची खात्री करा.

टीप: तुम्ही तुमच्या बँक तपशिलात काही बदल करायचा असल्यास, तो याच पद्धतीने अपडेट करू शकता.

बोनसच्या घोषणेची सद्यस्थिती

बांधकाम मंत्र्यांनी दिवाळी बोनसची घोषणा केली असली तरी, या संदर्भात अद्याप कोणताही अधिकृत सरकारी निर्णय (जीआर – Government Resolution) जारी करण्यात आलेला नाही. गेल्या काही वर्षांत अशा घोषणा झाल्या, पण अनेक कामगारांना प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही, असा अनुभव आहे.

त्यामुळे, तुम्ही कोणत्याही एजंटच्या भूलथापांना बळी पडू नये आणि दिवाळी बोनसच्या नावाखाली पैसे देऊ नये. अधिकृत जीआर जारी झाल्यावरच पुढील प्रक्रिया सुरू होईल.

तुम्ही तुमचा बँक तपशील तपासला आहे का?

WhatsApp Icon व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment