महाराष्ट्र अतिवृष्टी नुकसान भरपाई पॅकेज २०२५: २५३ तालुक्यांसाठी मदत जाहीर (९ ऑक्टोबरचा GR)
महाराष्ट्र शासनाने जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील २५३ तालुक्यांतील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज आणि सवलती घोषित केल्या आहेत.
बाधित क्षेत्र घोषणा
राज्यातील २५३ तालुके जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहेत. (या तालुक्यांची यादी शासन निर्णयात जोडलेली आहे.)
आपत्ग्रस्त बाधितांना देय विशेष आर्थिक मदत
मदतीचा प्रकार | तपशील | मदतीची रक्कम |
मनुष्यहानी | आपत्तीमुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना | ₹४,००,०००/- |
गंभीर अपंगत्व | ६०% पेक्षा अधिक अपंगत्व झाल्यास | ₹२,५०,०००/- |
अंशतः अपंगत्व | ४०% ते ६०% अपंगत्व झाल्यास | ₹७४,०००/- |
जखमी व्यक्ती (इस्पितळात दाखल) | एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी | ₹१६,०००/- |
एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी | ₹५,४००/- | |
घरांचे पूर्ण नुकसान | पक्की/कच्ची घरे (सपाट भागातील) | ₹१,२०,०००/- प्रति घर |
पक्की/कच्ची घरे (डोंगराळ भागातील) | ₹१,३०,०००/- प्रति घर | |
घरांचे अंशतः नुकसान | पक्की घरे | ₹६,५००/- प्रति घर |
कच्ची घरे | ₹४,०००/- प्रति घर | |
झोपडी नुकसान | झोपडी पूर्ण नष्ट झाल्यास | ₹८,०००/- प्रति झोपडी |
गोठा नुकसान | गोठा पूर्ण नष्ट झाल्यास | ₹३,०००/- |
मृत जनावरे व शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत
१. मृत जनावरांसाठी (प्रति जनावर)
- दुधाळ जनावरे: ₹३७,५००/-
- ओढकाम करणारी जनावरे: ₹३२,०००/-
- लहान जनावरे (उदा. गायीचे वासरू): ₹२०,०००/-
- शेळी/मेंढी: ₹४,०००/-
- कुकुटपालन (कोंबडी): ₹१००/- प्रति कोंबडी
२. शेती पिकांचे नुकसान (३ हेक्टरच्या मर्यादेत)
पिकाचा प्रकार | मदतीची रक्कम (प्रति हेक्टर) |
जिरायती पिके (उदा. खरीप हंगाम) | ₹८,५००/- |
बागायत पिके (आश्वासित सिंचनाखालील) | ₹१७,०००/- |
बहुवार्षिक पिके (उदा. फळबागा) | ₹२२,५००/- |
३. शेतजमिनीचे नुकसान
- गाळ काढणे: ₹१८,०००/- प्रति हेक्टर.
- जमीन खरडणे/वाहून जाणे (केवळ अल्प/अत्यल्प भूधारक): ₹४७,०००/- प्रति हेक्टर.
४. मत्स्य व्यवसाय मदत
- बोटीची दुरुस्ती/जाळी दुरुस्ती: ₹६,०००/- (जाळ्यांसाठी ₹३,०००/-)
- बोट पूर्ण नष्ट झाल्यास: ₹१५,०००/- (जाळी पूर्ण नष्ट झाल्यास ₹४,०००/-)
विशेष सवलती आणि महत्त्वपूर्ण सूचना
या मदतीसोबतच बाधितांना काही महत्त्वाच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत:
- जमीन महसूलात सूट.
- सहकारी कर्जाचे पुनर्गठन.
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला एका वर्षासाठी स्थगिती.
- तिमाही वीज बिलात माफी.
- शालेय/महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी (१०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांच्या फी मध्येही माफी).
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची विशेष मदत
- रब्बी हंगामासाठी मदत: कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर ₹१०,००० प्रमाणे ३ हेक्टरच्या मर्यादेत थेट बँक खात्यात मदत दिली जाईल.
फार्मर आयडी आणि e-KYC बद्दल स्पष्टता
- e-KYC ची गरज नाही: ज्या शेतकऱ्यांची ‘ऍग्रीस्टॅक’ मध्ये नोंदणी झाली असून e-KYC झालेली आहे, त्यांना डीबीटीद्वारे मदत वितरणासाठी आवश्यक असलेल्या e-KYC प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे.
- आधार लिंक मदत: फक्त तुमचा फार्मर आयडी (Farmer ID) असणे महत्त्वाचे आहे. फार्मर आयडी हा आधार कार्डशी लिंक असल्याने, नुकसान भरपाईचे पैसे आधार कार्ड थ्रू थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. e-KYC साठी वेगळी धावपळ करण्याची गरज नाही.
